कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात २७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १८३४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १४,  हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ५, राधानगरी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा एकूण २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९३३४ वर पोहोचली असून  ४७, ५३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृत रुग्णांची संख्या १६९६ झाली असून सध्या १०६ जणांवर उपचार सुरू आहेत.