कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात १५ जणांना लागण

0
95

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सलग आज दुसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा शून्यावर पोहचला. दिवसभरात २१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४३८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ४, गडहिंग्लज तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९, ३६९ झाली असून ४७, ५८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत १६९६ जणांचा मृत्यू झाला असून ८८ जणांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here