कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासांत १२ जणांना लागण

0
107

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात २८ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापुरात उपचार सुरू असलेल्या निपाणी येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहर ४, भुदरगड १, गडहिंग्लज १, करवीर १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा १२ जणांचा समावेश अशा एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९,३१० झाली असून ४७, ५०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६९३ जणांचा मृत्यू झाला असून ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here