झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप

0
49

मुंबई (प्रतिनिधी) : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. ही तरूणी बॉलिवूडमध्ये आपले करीअर करण्यासाठी आली होती. तिच्या आरोपांमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. 

सोरेन यांनी ५ सप्टेंबर २०१३ मध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर मला ठार मारण्याची धमकी दिली, असे या  तरूणीने म्हटले आहे. त्यानंतर ४५ दिवसानंतर मी मुंबईतील मेट्रोपोलिटन कोर्टात याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र, ९ दिवसांनतर तक्रार पुन्हा माघारी घेतली होती. संबंधित तरूणीचे ८ डिसेंबरला २०२० ला एक पत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले असून त्यात या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी वांद्रे पोलिसांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, झारखंडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here