कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला एमएसपी मिळावी यासाठी दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकारी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप सरकारने शेतकऱ्यांवर ड्रोनद्वारे अश्रूधुराचे नळकांडे रब्बर पॅलेट्सचा वापर केला जात आहे. या अमानुष प्रकाराने अनेक शेतकऱ्यांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. यातच पोलीसांच्या गोळीबारात शुभकरण सिंग या तेवीस वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला.

आज (सोमवार) इंडिया आघाडीच्यावतीने या गोळीबाराविरोधात कोल्हापूरातील बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, स्वामीनाथन आयोग लागू न करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो च्या घोषणा आंदोलकांनी लगावल्या.

यावेळी दिलीप पवार, उदय नारकर, विजय देवणे, सचिन चव्हाण, संदीप देसाई, सुनील मोदी, बाबुराव कदम, सुभाष देसाई, अरुण गळतगे, उदय पोवार, इस्थेर कांबळे, उषा वडर, अक्षय शेळके, किरण साळोखे, विजयानंद पोळ, सर्फराज रिकीबदार, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.