कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शन वेळेत वाढ करण्यात आली आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.  

याआधी दोन्ही मंदिरातील दर्शन वेळेत टप्या- टप्प्याने वाढ कऱण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी मंदिर खुले केले जात होते. तर दुपारी मंदिर बंद ठेवले जात होते. आता सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. तसेच भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अंबाबाई मंदिराच्या चार दरवाजापैकी दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.