मुंबई (प्रतिनिधी) :  आपल्या देशात हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. परंतु, भारतामध्ये मध्य प्रदेश येथील गौरिया जमातीमध्ये हुंडा म्हणून चक्क २१ विषारी साप देण्याची प्रथा आहे. हे साप दिले नाहीत तर लग्नात अपशकुन होतो अशी त्यांची धारणा आहे.

मध्य प्रदेश येथील गौरिया जमातीमध्ये हुंडा म्हणून २१ विषारी साप दिले जातात. हे साप वधुपिता स्वतः जाऊन पकडून आणतो. तसेच हे साप लग्नात हुंडा म्हणून दिल्यास कोणतेहे विघ्न येत नसल्याची त्यांची भावना आहे. तसेच हे साप दिल्यानंतर वैवाहिक आयुष्य सुखी होत असल्याचा त्यांचा समज आहे. लग्नात नागासारख्या विषारी सापांचा समावेश असतो.