केरळ (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाला जखडून टाकणाऱ्या कोरोना महामारीवर अखेर लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. ही लस प्रत्येकापर्यंत पोहोचावी यासाठी सरकारकडून मोठा प्लॅन सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोना लशीबाबत एका राज्यात मोफत लस देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. भारतात फार्मा कंपनीच्या कोणत्याही लस वापरण्यासाठी मंजूर झालेली नसली तरी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक तयारी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळसह अनेक राज्यात तयारी अंतिम टप्प्यात आहे. लस साठवून ठेवण्यापासून ते लसीकरण प्राधान्य देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. त्याचबरोबर केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. राज्यातील लोकांना कोरोना विषाणूची लस विनाशुल्क दिली जाईल, असे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काल (शनिवारी) मोठी घोषणा केली.