महाविद्यालयासमोर प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवले

0
43

नागपूर (प्रतिनिधी) : प्रियकराने विवाहित प्रेयसीला पेट्रोल  टाकून जिवंत जाळून टाकले. ही संतापजनक घटना नागपूर मधील  अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. आगीत होरपळलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान शनिवारी (दि.२६) मृत्यू झाला. या घटमेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.  

शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे नोकरी करत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात  प्रियकराने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत  आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.   या प्रकऱणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here