कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : सहकारातील अग्रगण्य खत कंपनी इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह अर्थात ‘इफको’च्या वतीने शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे हिवाळ्यात उपयुक्त ब्लँकेट गरजूंना वाटप करण्यात आले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी ही संकल्पना मांडली होती. ‘इफको’चे आमसभा सदस्य व गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, शामराव पाटील – वाळोलीकर, जिल्हा क्षेत्र अधिकरी विजय बुनगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. 

या वेळी विश्वास पाटील म्हणाले की, जगातील ३०० कंपन्यांमध्ये इफकोला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. खते उत्पादन व विक्रीतील ही मोठी व सर्वांत जास्त २०% डिव्हिडंड देणारी  प्रथम संस्था आहे. इफकोचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.

प्रारंभी एकनाथ विद्यालय व शिवाजीराजे रेसिडेन्सी स्कूलच्या शिक्षिका माया भोगावकर यांना शिक्षण जागर पुरस्कार मिळालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उर्मिला पाटील, रयत संघाचे मॅनेजर तानाजी निगडे, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, नंदकुमार पाटील, माधव पाटील, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, एस. के. पाटील, सुनील पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, मच्छिंद्र कांबळे  आदी उपस्थित होते.