थेट तुरुंगातून ‘तो’ लढवतोय ग्रामपंचायत निवडणूक

0
307

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव हिंडलगा कारागृहातून खुनाच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील आरोपी निवडणूक लढवत आहे. बेळगाव तालुक्‍यातील मुचंडी येथील रहिवासी व श्रीराम सेना हिंदूस्तान संघटनेचा कार्यकर्ता परशराम भरमा पाखरे (वय ३७) असे त्याचे नाव आहे.

प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवीत आहे. पाखरेचे निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा आहे. महेश नामक तरुणाच्या खून प्रकरणांत पाखरे याच्यावर गुन्हा दाखल झाला. सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून तो कारागृहात आहे. यात इतर आरोपींना अटक करताना पाखरेलाही अटक करण्यात आली. गल्लीतील रहिवाशी आणि मित्रांनी निवडणूक लढवण्यासाठी त्याच्याकडे आग्रह धरला. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, प्रभागात पाखरेसह चौघे उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पाखरे याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here