यड्रावमध्ये गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

0
181

इचलकरंजी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील वातावरण तापू लागले आहे. यड्रावसह तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराला वेग येऊ लागला आहे. यड्रावमध्ये श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीने आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात केली. गावातील सर्व मंदिरामध्ये उमेदवारांनी आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात केली.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांची ग्रामपंचायत मध्ये सत्ता आहे. जिल्हा परिषदच्या मार्फत त्यांनी गावासह मतदार संघामध्ये विकासकामे खेचून आणली आहेत. कामाच्या जोरावर सत्ता कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.  यावेळी सर्व उमेदवार, गुरुदेवदत्त ग्रामविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here