कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा वापर करून १० ते १५ कोटींचा घरफाळा न भरता संपूर्ण कोल्हापूरकरांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजप नेते धनंजय महाडिक यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केला आहे.

 

 

महाडिक म्हणाले की,  महापालिकेकडून घरफाळा आणि पाणीपट्टीत वाढ होत आहे. तूट असल्याचे कारण सांगून वाढ केल्याचे सांगितले जात आहे. परंतु १५ ते २० हजार मिळकती अशा आहेत की, त्यांचा घरफाळा शून्य दाखविला आहे. यामध्ये डी. वाय.पाटील ग्रुपच्या  कंपन्या आहेत. त्यांचे भाडेकरार आम्ही काढले आहेत. येथे ३० प्रॉपर्टी आहेत. करार झाल्यापासून २४ प्रॉपर्टीची माहिती घेतली असता १० ते १५ कोटींची चोरी झालेली आहे. पालकमंत्री यांच्या ड्रीम वर्ल्डच्या घरफाळ्याचे शून्य बिल कसे? याची वसुली करण्यात यावी. १ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते? येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे ? असा सवाल महाडिक यांनी केला.

पालकमंत्री यांच्या ड्रीम वर्ल्डच्या घरफाळ्याचे शून्य बिल कसे? याची वसुली करण्यात यावी. १ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते? येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे ? असा सवाल करून  पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या हॉटेलचा घरफाळा भरलेला नाही. यामध्ये  खूप मोठा घोटाळा झाला आहे. ३० मिळकतीचे एकूण १६ कोटी भरलेले नाही. त्याची वसुली आधी महापालिकेने करावी. ती वसुली झाल्याशिवाय जनतेनेही घरफाळा भरू नये, असे आवाहन महाडिक यांनी यावेळी केले.