कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  गार्डन्‍स क्‍लब कोल्‍हापूर यांच्‍याकडून दिला जाणारा ‘हरित समृध्‍दी’ पुरस्‍कार गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण नरके यांना मिळाल्‍याबद्दल गोकुळ  संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्‍या हस्ते नरके यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

एक प्रगतशील शेतकरी म्हणून काम करत असताना त्यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्‍या पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून नवे मापदंड निर्माण केले. अरुण नरके यांनी गेली ४५ वर्षे सातत्याने डेअरी,  कृषी आणि सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. विविध सामाजिक कार्यामध्‍ये त्‍यांचा पुढाकार नेहमीच राहिला आहे. हरित समृध्‍दी पुरस्‍काराने त्‍यांच्‍या कार्याची त्‍यांना पोच पावती  मिळाली. हरितयोध्‍दा म्‍हणूनच हा प्रथम वर्षीय पुरस्‍कार त्यांना मिळाला आहे.

यावेळी माजी चेअरमन विश्‍वास पाटील,  संचालक  अरूण डोंगळे,  विश्‍वास जाधव, आमदार राजेश पाटील,  पी.डी.धुंदरे, धैर्यशिल देसाई, बाळासो खाडे, उदय पाटील, रामराजे देसाई-कुपेकर, बाबा देसाई, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर(माई), अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम. पाटील,  जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.