गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील ५० पैकी ४४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८०.११ टक्के मतदान झाले होते. ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतदारांनी सर्वपक्षीयांना संमिश्र कौल दिला आहे.

तालुक्यातील निकाल पुढीलप्रमाणे – (ग्रामपंचायतीचे नाव, विजयी पक्ष – आघाडी, मिळालेल्या जागा या क्रमाने)

जरळी – काडसिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेल – ११ (सर्व जागा) सत्तांतर घडवत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता…

शेंद्री – साईबाबा ग्रामविकास पॅनेल – ८,  भाजप-शिवसेना-वंचित आघाडीने राष्ट्रवादीला (केवळ १) धक्का देत घडवले सत्तांतर

नूल – जय हनुमान ग्रामविकास आघाडी – ११, राष्ट्रवादी-जनता दलाची सत्ता कायम…

मुंगुरवाडी –  भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल – ४, शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेसने सत्ता राखली

चन्नेकुप्पी – ग्रामविकास पॅनेल – ६, सत्ताधाऱ्यांचा पुन्हा विजय…

हनिमनाळ – हनुमान ग्रामविकास आघाडी – ८, सत्ताधारी भाजपाचा दणदणीत विजय

उंबरवाडी – युवा शेतकरी ग्रामविकास पॅनेल – ७,  राष्ट्रवादी-काँग्रेस-युवा सेनेने घडवले सत्तांतर, आप्पी पाटील गटाला धक्का

शिप्पूर तर्फ आजरा – हर हर महादेव विकास आघाडी – ६, राष्ट्रवादीने सत्ता राखली

लिंगनूर क. नूल – महालक्ष्मी ग्रामविकास आघाडी – ७, राष्ट्रवादीला धक्का देत सत्तांतर,

मांगनूर तर्फ सावंतवाडी – भावेश्वरीदेवी ग्रामविकास पॅनेल – ७.

वडरगे – गोसावीनाथ महाविकास आघाडी – ९, राष्ट्रवादी-शिवसेनेचा दणदणीत विजय, गावात सत्तांतर

हेब्बाळ-जलद्याळ – महाविकास आघाडी – ६, सत्तांतर घडवत राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसने मिळविली सत्ता

निलजी – जय हनुमान ग्रामविकास पॅनेल – ५, भाजप-राष्ट्रवादी-जनता दलाची सत्ता

शिप्पूर तर्फ आजरा – हर हर महादेव विकास आघाडी – ६, राष्ट्रवादीने सत्ता राखली

हुनगिनहाळ – हनुमान ग्रामविकास आघाडी – ४, जनता दलाने घडवले सत्तांतर, अप्पी पाटील गटाला धक्का