कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. बऱ्याच महिन्यांनंतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शंभराहून कमी म्हणजे ९४ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ पर्यंत चोवीस तासात २० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ७, आजरा तालुक्यातील ४, गडहिंग्लज तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १५५९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९,३५४ वर पोहोचली असून ४७,५६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६९६ जणांचा मृत्यू झाला असून ९४ जणांवर उपचार सुरू आहेत.