गडहिंग्लज भूमिअभिलेख अधिकाऱ्यांचे शिवसैनिकांना आश्वासन…

0
134

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज शहर आणि नेसरी-कोवाड मार्गावरील भूखंडावरील ‘कजाप’ मधील बनावटगिरी उघडकीस आली होती. यावर शिवसेनेने भूमिअभिलेख कार्यालय समोर आंदोलन करून बनावटगिरी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण दोन महिने या कार्यालयामध्ये काहीच हालचाल न दिसल्याने शिवसेनेने भूमिअभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार आज (रविवार) शिवसैनिक तेथे गेले असता अगोदरच तिथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसैनिकांनी भूमिअभिलेख अधिकारी मनोज महाजन यांच्याशी चर्चा केली असता महाजन यांनी ‘कजाप’ मध्ये बनावटगिरी करणारे सापडले आहेत. त्यांची चौकशी सुरु सुरु असून त्यांच्या तारखा सुरू आहेत. तसेच लवकरच पोलिस फिर्याद नोंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या आंदोलनात शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी,राजू मांगले, प्रकाश पाटील, शरद लोखंडे, हलप्पा भमानगोळ, मारुती कुंभार, निकेतन चव्हाण, दिपक डवरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here