गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गडहिंग्लज दौऱ्यावर आले आहेत. यावेळी गडहिंग्लज शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी ना. मुश्रीफ यांच्या हस्ते महिलांना आज (शनिवार) निवडीच्या पत्रांचे वाटप करण्यात आले.

यामध्ये सुनिता नाईक (गडहिंग्लज शहर कार्याध्यक्ष), उर्मिला जोशी (शहर उपाध्यक्ष),  अश्विनी मगदूम (शहर उपाध्यक्ष), रेश्मा कांबळे (शहर उपाध्यक्ष), अरुणा कोलते (खजिनदार), माधूरी शिंदे (गडहिंग्लज शहर चिटणीस), सुवर्णा चांदेकर (शहर सरचिटणीस), कमलीनी शिंदे (शहर सरचिटणीस), उज्वला कुंभार (शहर ओबीसी सेल अध्यक्षा), शबाना मकानदार (शहर अल्पसंख्याक सेल अध्यक्षा) असे आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.