गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज बसस्थानकावर मागील ८ महिने शुकशुकाट होता. गडहिंग्लज हे शैक्षणिक, वैद्यकीय तसेच चार तालुक्यांची महत्वाची बाजारपेठ असल्याने येथील बस स्थानकावर नेहमीच गर्दी असायची. पण लॉकडाऊनमुळे हे सर्व ठप्प होते.

सध्या लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता दिली असून शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे बसस्थानकावर विद्यार्थ्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय पास सुविधा देखील सुरू केल्याचे येथील आगर प्रमुखांनी सांगितले. शिवाय विविध मार्गांवर बस वाहतूक सुरू केल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.