आठ बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक : कंपनीवर गुन्हा

0
67

हैदराबाद (प्रतिनिधी) : येथील आयव्हीआरएसएल  या  कंपनीविरोधात  ८ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केल्याप्रकऱणी स्टेट बँक ऑफ इंडियाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी,  सह-व्यवस्थापकीय संचालक आर. बलरामी रेड्डी  यांच्यासह सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात  सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने आरोपींच्या कार्यालये आणि घरांवर छापा टाकून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

आयव्हीआरएसएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. मागील २५ वर्षांपासून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण, ऑपरेशन्स आणि देखभाल आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये काम करत आहे.

या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया,  आयडीबीआय बँक,  कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया या बँकांची सुमारे ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. कंपनीने लेटर ऑफ क्रेडिट्सच्या  माध्यमातून संबंधित लोकांना पैसे दिले. त्यांनी खरेदी व्यवहारांची नोंद न करता कंपनीच्या खात्यात हा निधी जमा केला आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here