शिरोळ (प्रतिनिधी) : आज (शुक्रवार) महिला दिनानिमित्त शिरोळ येथे शासकीय निमशासकीय महिला कर्मचारी, महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिरोळ येथील बसस्थानक आणि परिसराची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या लक्ष्मीबाई गायकवाड यांचा साडी, शाल देऊन पूजा हेरवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खंडेराव हेरवाडे यांनी काल शासकीय, निमशासकीय कार्यालय, माध्यमिक शाळेतील महिला कर्मचाऱ्यांना पेन देऊन महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिरोळ बसस्थानक कंट्रोलर आवगडे, चेतन बनसोडे, प्रमोद कोळी, बाळासो माळी, दगडू चव्हाण, पांडूरंग पवार, आराध्या हेरवाडे, प्रवासी, ग्रामस्थ उपस्थित होते.