मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत किसान सभेच्या मोर्चात सुमारे २० हजार शेतकरी सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु या मोर्चावरून केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत. कायदा हा सरकारने केला आहे, त्यामुळे मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे.