संजीवन विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात…

0
197

पन्हाळा (प्रतिनिधी) :  पन्हाळा येथील संजीवन विद्यानिकेतनमध्ये आज (मंगळवार) श्रीनिवास रामानुजन या गणित  तज्ञांचा जन्मदिन हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न केला. यावेळी गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशासिका सौ. श्रद्धा कुमठेकर, उपप्राचार्या सौ. शिल्पा पाटील-सांगावकर उपस्थित होत्या.

यावेळी, विद्यार्थ्यांनी गणिती सुंदर विचारांचा आणि कोडी संख्यातील सौंदर्यपूर्ण रचनाचे बोर्ड सजविले होते. त्यामध्ये संख्यांचे अजब मनोरे, गंमत पाढ्यांची तसेच गणिताच्या अरण्यातून जाताना सूत्रांची बंदुक हाती असावी लागते, गणित म्हणजे संख्या संगतीचा अभ्यास करणारे शास्त्र ,गणित म्हणजे असतं काय अंकांची गंमत दुसरे काय, अधिक-उणे बेरीज वजा गणित म्हणजे मजाच मजा, कोण म्हणतं गणित अवघड असतं अभ्यासू विद्यार्थ्याला प्रयत्न अवधान आवश्यक असतं, असे अनेक  गणिती विचारांचे फलक सजले होते. संताजी कुराडे, संदेश भोसले, रोहित जगताप, विशाल दौंडकर, आर्यन शेटे या विद्यार्थ्यांनी गणित विषयावर भाष्य केले.  गणित सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये नववी, दहावी, बारावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले विशाल पाटील, अजित वाघमारे,  स्वराज जाधव, आदित्य नलवडे, संदेश भोसले, आर्यन शेटे, अभिजीत झेले, गोविंद निकम तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी ए.एम. सदगर, माधुरी कुलकर्णी, अमरसिंह पांगे, राजू खोत, सुनील शिंदे, महेंद्र कुलकर्णी, शैलजा सूर्यवंशी, स्मिता आयरे-गुजर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here