मुंबई  (प्रतिनिधी) : दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केले आहे की नाही, याची चाचणी केली जात होती. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केले आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घराबाहेर पडत असाल आणि मद्यपान करून गाडी चालवत असाल, तर फक्त तुमच्यावरच नाही तर गाडीत तुमच्यासोबत असलेल्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता मद्यपानाचे सेवन करून गाडी चालवणाऱ्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे. जर त्यांनी मद्यपानाचे सेवन केले असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक ऍक्ट नुसार कारवाई केली जाणार आहे.