मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये  राजकीय कलगीतुरा रंगला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने या नामांतराला विरोध केला आहे. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.   

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करणे, हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद करा. कोणत्याही शहराचे नामांतर करायचे असेल, तर महानगरपालिकेचा प्रस्ताव, त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आणि त्यानंतर केंद्राची मंजुरी अशी प्रक्रिया असते. औरंगाबाद  महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तसेच राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापालिकेत ठराव करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात यावा, असे दरेकर म्हणाले.