मुंबई (प्रतिनिधी) : युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याच्या मुद्दा शिवसेनेने मांडला होता. यावरून काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला फटकारले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   

शिवसेना हा पक्ष युपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरूनच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची चर्चा सुरू झाली होती. अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे, असे शिवसेनेने म्हटले होते. शिवसेनेने दिलेल्या या सल्ल्याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.