कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात अनेक व्यावसायिक, उद्योजक, सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशावेळी विज बिल भरणे ग्राहकांना शक्य नाही. तसेच लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्याचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. ऑक्टोबर २०२० नंतरचे वीज बिल हप्त्याने भरण्याची मुभा देण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन वीज बिल भरणार नाही, कृती समितीचे सदस्य आणि ग्रा. पं. सदस्य जितेंद्र यशवंत यांनी गडमुडशिंगी महावितरण कार्यालयातील शाखा अभियंता महेश मुधाळे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळातील थकित वीज बिलापोटी  ज्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे अशा सर्वांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडावे. तसेच सक्तीने वीज कनेक्शन तोडण्याची अन्यायी कारवाई सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी सचिन घाटगे, संजय रामचंद्र सोनुले, शैलेश सकटे, शरद लोखंडे, निखील लोखंडे, राजु सकटे, वैभव घाटगे, महेश सकटे, राजेश लोखंडे, ग्रामस्थ उपस्थित होते.