कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गटप्रवर्तकांचा मेळावा महालक्ष्मी भवन येथे संपन्न झाला, आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून मिळवलेल्या यशाबद्दल तसेच जिल्हयातील गटप्रवर्तकांना पीएचसी तालुकास्तरावर येणाऱ्या अडचणींबाबत आज (रविवार) हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यासाठी कॉ. सलिम पटेल (महासचिव) महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशन, सीआयटीयूचे  जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे, कॉ. शिवाजी मगदूम, सीएलटीयूचे राज्य पदाधिकारी, इंद्रजित पाटील कागल बीसीएम मार्गदर्शक म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. नेत्रदिपा पाटील होत्या.

आशा सेविका आणि गट प्रवर्तक याना शासकीय सेवेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करू, अँपच्या माध्यमातून आशा, गटप्रवर्तक यांनी केलेल्या कामाचा आढावा शासनाला देऊ आणि केलेल्या कामाचा जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे महासचिव सलीम पटेल यांनी मार्गदर्शनमध्ये सांगितले.

यावेळी सीमा पाटील, संगिता पाटील, जिल्हा सचिव कॉ. उज्वला पाटील, आरती भोसले, सारिका पाटील,विमल आतिग्रे,राधिका घाटगे, पुनम माळी, अनुजा माळी, वसुधा बुडके आदी उपस्थित होते.