सावरवाडी (प्रतिनिधी) : गेल्या चार-पाच दिवसापासून करवीर तालुक्यात जोरदार रब्बीच्या पावसाने जोर धरला आहे. दररोज पावसाच्या हजेरीने खरीप पिकांच्या काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. ऐन भरणीला येणारी भाताची पीके कोलमडू लागली आहेत. परिणामी भातपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. जोरदार पावसामुळे करवीर तालुक्यात सर्वत्र भुईमग, सोयाबीन पिकांच्या काढणीची कामे थंडावली आहेत. जोरदार पावसामुळे आडसाली ऊस लागणीच्या उगवणीवर परिणाम होऊ लागला आहे.