कोल्हापूर (प्रतिनिधी) : बर्ड फ्लू रोगाचा प्रसार होत असल्याने शहर आणि जिल्हयातील चिकन, मटण सेंटर चालकांनी रोज निर्जंतुकीकरण करावे, बाधित भागातील कोंबड्या आणू नये, अशी सूचना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, विविध राज्यात बर्ड फ्लू आजाराचा संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पोल्ट्री व्यवसायिकांनी विशेष काळजी घ्यावी. मयत झालेल्या पक्षांची माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यास द्यावे. कोंबड्याचे मांस व अंडी शिजवून खाल्ल्याने या आजाराची लागण मनुष्यास होत नाही. तरीही मटण विक्रेत्यांनी काळजी घ्यावी. मटण विक्रेत्यांनी पक्षांचे पिसे, त्वचा उघड्यावर टाकू नये. संशयित पक्ष्यांची विक्री पूर्णपणे थांबवावी.