मुंबई, (प्रतिनिधी) : बलात्काराचे आरोप आणि विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मुंडे दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्यासमोर धनंजय मुंडे आपल्यावर केलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडणार आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धनंजय मुंडे यांना कोणता सल्ला देतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. धनंजय मुंडे यांची बलात्कार प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.