गडहिंग्लज बसस्थानक परिसरात एटीएम सेंटर सुरू करण्याची मागणी

0
80

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे मोठी बाजारपेठ आहे. चंदगड, आजरा, भुदरगड व सीमाभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात दवाखाना, शैक्षणिक कामासाठी तसेच विविध वस्तू खरेदीच्या निमित्ताने इथे येत असतात. परंतु बसस्थानक परिसरात कोठेही एटीएम सेंटरची सोय नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होते. एटीएम शोधण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागते. त्यामुळे येथील गडहिंग्लज आगार व्यवस्थापकांनी कोणत्याही बँकेशी चर्चा करून बसस्थानक आवारात एटीएम सेंटरची सोय करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी आज (सोमवार) याबाबतचे निवेदन गडहिंग्लज आगारप्रमुखांना दिले. या वेळी महादेव नाईक, राहुल गाताडे, अस्लमभाई बेडसुर, निकेतन चव्हाण, उदय पाटील, राजू कोरवी, संतोष कुरबेट्टी, महेश नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here