मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून आतापासूनच भाजप-शिवसेनेचे दावे–प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला सुचक इशारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीचे होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबईवर दिल्लीचेही लक्ष राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई महापालिका निवडणुकीत जातीने लक्ष घालणार असल्याचे संकेत पाटील यांच्या विधानातून मिळत आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. परंतु २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपकडून मोठे आव्हान दिले जाण्याचा सुचक इशारा पाटील यांच्या विधानातून मिळत आहे.