जिल्ह्यातील दत्तजयंती उत्सव रद्द : जिल्हाधिकारी

0
177

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध धार्मिक स्थळे, मंदिरे, धर्मादाय संस्था, मंडळांच्या वतीने दि.२९ व ३० डिसेंबररोजी साजरी होणारी दत्तजयंती उत्सव व महाप्रसाद वाटप कार्यक्रम रद्द केला आहे. फक्त प्रतिकात्मक स्वरुपात श्री दत्तजयंती साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

गगनबावडा येथे गगनगडावर सालाबाद प्रमाणे दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. दत्त दयंती उत्सव काळात येथे हजारो भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी दत्त जयंती निमित्त भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत श्री. गगनगिरी महाराज ट्रस्ट यांना पत्र पाठवलेले आहे. दरम्यान या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here