कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील डी. वाय. पाटील विद्यापीठाचा ९ वा दिक्षांत सोहळा आज (बुधवार) संपन्न झाला. या दीक्षांत समारंभात प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन आणि साहित्यिक प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना डी.लिट आणि एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी. एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले.

या दीक्षांत समारंभात एकूण ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली असून यावेळी ९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने तर २ विद्यार्थ्यांना एक्सलन्स ऑफ रिसर्च म्हणून सन्मानित करण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले तर अध्यक्षपदी कुलपती डॉ. संजय डी. पाटील उपस्थित होते. यावेळी, अभिनेते आर. माधवन आणि साहित्यिक प्रा. कुंतीनाथ करके-पाटील यांना डी.लिट व एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी. एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले.