कळे येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या तिघांविरूद्ध गुन्हा

0
344

कळे (प्रतिनिधी) : बेकायदा मद्य सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. अरुण बाळकृष्ण पाटील (वय ३९), प्रशांत मधुकर पाटील (वय ४१, रा.कळे), कुणाल अशोक पोवार (वय ३२, रा. भगतसिंग गल्ली, बुधवार पेठ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

कळे पोलीस रात्री पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, कळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महादेव मंदिराजवळ तिघेजण रात्री सव्वा नऊच्या सुमारास मद्य सेवन करून मोठमोठ्याने आरडाओरडा व गैरवर्तन करत असताना आढळले. पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुशांत धनवडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here