टोप (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे आज (सोमवार) सकाळी दहा वाजता आ. राजू  आवळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी १०५ लोकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये अंबप आणि शिरोली या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या सर्व गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही यांना लस देण्यात आली.

यावेळी हातकणंगले पं.स.चे सभापती डॉ. प्रदीप पाटील, पंचायत सदस्या डॉ. सोनाली पाटील, सरपंच शशिकांत  खवरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे,  डॉ. सुहास कोरे, डॉ. हर्षल शिखरे, वैद्यकीय अधिकारी  ए. एस. पाटील, प्रशांत घोलपे, डॉ. प्रिती दातीर, एस.आर.कांबळे उपस्थित होते.