मुंबई (प्रतिनिधी) : ऑनलाईन शॉपिंगमधील नावाजलेला ब्रँड अॅमेझॉन कंपनीने मुंबईत ठिकठिकाणी लावलेले पोस्टर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकले. याप्रकऱणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस सत्र न्यायालयाने पाठवली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

‘नो मराठी नो अॅमेझॉन ही मोहीम मनसेने अधिक आक्रमक केली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनने लावलेली पोस्टर फाडून टाकली.  अॅमेझॉनच्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी मनसेने लावून धरली आहे. मात्र, त्यास अॅमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता ही वाद न्यायालयात पोहोचला आहे.

दिंडोशी पाठोपाठ सांताक्रुझ विमानतळ विलेपार्ले हायवे परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या फलकांना काळे फासले. त्याचबरोबर ठिकठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर देखील फाडून टाकण्यात आले आहेत.