नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. २०२१ च्या सुरुवातीपर्यंत एकतरी लस बाजारात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एकसाथ लस देणे शक्य नाही. या लसीच्या वितरणासाठी नॅशनल व्हॅक्सिन ग्रुप तयार करण्यात आला आहे. कोणत्या गोष्टींच्या आधारे कुणाला लस द्यायची याचा निर्णय हा नॅशनल ग्रुप घेणार आहे. यासाठी काही नियम देखील बनवले जात आहेत. हरियाणामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, सुरुवातीला लसीचा पुरवठा कमी असणार आहे. त्यामुळे रिस्क असेसमेंटनुसार कुणाला याची किती गरज हे हे ठरवले जाणार आहे. परंतु भारतात व्हीआयपी कल्चर असल्याने या लसीकरणाला याचा फटका बसू शकतो.

लसीकरणामध्ये हे व्हीआयपी कल्चर मोठी अडचण ठरू शकते. त्यामुळे आता हे लसीकरण कशा प्रकारे होणार असा प्रश्न सगळीकडे उपस्थित केला जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला कोरोना लस द्यायला सुरुवात केली जाईल असे सांगण्यात येत आहे. पन ही लस सर्वात आधी कुणाला मिळणार असा सवाल आता उपस्थितीत होत आहे.

अनेक राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी  आणि डॉक्टरांनाही लस देण्यात येणार आहे. यासंदर्भात मध्य प्रदेशातील एक अधिकाऱ्याने सांगितले होते, कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात व्हीआयपी कल्चरचा कोणताही प्रभाव पडणार नाही. त्याचबरोबर दिल्ली सरकारने देखील यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले असून आरोग्य कर्मचारी आमच्यासाठी व्हीआयपी असून आम्ही कोणत्याही पद्धतीने यामध्ये चूक होऊ देणार नाही. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाणार असल्याची घोषणा दिल्ली सरकारने आणि राज्य सरकारने केली आहे.