कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात चौघांना लागण, तर एकाचा मृत्यू…

0
89

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात २० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १३९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २, करवीर तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा एकूण ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सांगली जिल्ह्यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,४५३.

एकूण डिस्चार्ज : ४७,६८४.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ७०.

एकूण मृत्यू : १६९९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here