कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २२१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ३, हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १,  इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कागल तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १ आणि आजरा तालुक्यातील १ अशा एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,९६६.

एकूण डिस्चार्ज : ४६,७९६.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ४९४.

एकूण मृत्यू : १६७६.