कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९६९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर ९, करवीर तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ अशा एकूण १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९, ४२५ एकूण डिस्चार्ज : ४७,६४०, उपचारासाठी दाखल रुग्ण : ८७.