कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ९१८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील १०,आजरा तालुक्यातील १,चंदगड तालुक्यातील १,करवीर तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,७४९.

डिस्चार्ज – ४७,९५०.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ८७.

मृत्यू – १७१२.