सर्वांत मोठया मॅजिक स्वेअरची निर्मिती करणाऱ्या कळेतील युवकांचा सत्कार…

0
105

कळे (प्रतिनिधी) : जगातील सर्वांत मोठया मॅजिक स्वेअरची निर्मिती करणाऱ्या कळेतील युवकांचा नागरी सत्कार झाला.  या जागतिक विक्रमाची नोंद ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. या युवकांची आज (गुरुवार) गावातून मिरवणूक काढण्यात आली.

एका चौकोनात असणाऱ्या अंकांची आडवी, उभी तिरपी बेरीज एक सारखी येणे याला मॅजिक स्वेअर म्हणतात. त्याची निर्मिती पंधराव्या शतकात झाली. पहिला विश्वविक्रम १९७५ मध्ये युएसएमध्ये नोंदविण्यात आला. त्यानंतर अनुक्रमे १९९४, २०१२ मध्ये झाला. त्यानंतर कळेतील सुरेश पांडुरंग सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अमर सनगर, मनोज चौगले, नितीन पाटील, अनिकेत सुतार, गायत्री पाटील , सोनाली पाटील, तेजस्विनी पाटील, श्रुतिका सुतार, सायली पाटील (चिंचवडे) यांनी ४०९६×४०९६ इतक्या संख्यांचा  मॅजिक स्वेअर बनविला. यात एकूण एक ते एक कोटी ६७ लाख ७७हजार २१६ एवढे अंक वापरले असून कोणताही अंक एकदाच वापरला गेला आहे.  मॅजिक स्वेअरमधील अंकांची आडवी, उभी तिरपी बेरीज ३४३५कोटी ९७लाख ४० हजार ४९६ इतकी येते.

दरम्यान, याची नोंद ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्यानंतर या युवकांची गावातून मिरवणूक काढून त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तर सुरेश सुतार यांनी १९९८ मध्ये बनविलेल्या २९२ कड्यांची ३४ फूट लांब विनाजोड लाकडी साखळीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

यावेळी संजय पाटील, युवराज बेलेकर, प्रसाद डकरे, एकनाथ पाटील, सुनील डबीरे, सर्जेराव पाटील, सुरेश भोसले यांच्यासह परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here