कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या आज (बुधवार) झालेल्या अधिसभेत गोंधळ माजला. प्रश्नोत्तराच्या तासात विद्यापीठ प्रशासनाने खोटी उत्तरे दिल्याने विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा संघटनेने सभात्याग केला. या वेळी सभागृहाबाहेर पडून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. तसेच विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा संघटनेने घोषणाबाजी करत विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभाराचा निषेध केला.

या वेळी २३ प्रश्नांपैकी तीन प्रश्नांवर वादळी चर्चा झाली. अधिसभा सदस्य आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात खडाजंगी झाली. अधिसभा सदस्य एल. जी. जाधव यांनी खोटी माहिती दिली त्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. कुलगुरू यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास तीनच प्रश्नांवर संपला.