नववर्षानिमित्त गडहिंग्लज येथील ‘नदीवेस’ मंडळाचा स्तुत्य उपक्रम 

0
250

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दरवर्षी ३१ डिसेंबर म्हणजे मौज मस्ती, पार्टी, आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचा दिवस.  पण या सगळ्याला फाटा देऊन पैशांची उधळपट्टी थांबवून गडहिंग्लज मधील नदीवेसचा राजा  मंडळाने  स्तुत्य उपक्रम  राबवून नवीन वर्षाचे स्वागत केले.

मंडळाने स्मशान भूमीत स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता पाणी मारून करण्यात आली. तसेच परिसरात वाढलेले गवत, आतील भागातील मृतदेहाची राख,  फुलांचे हार,  तसेच संपूर्ण बेड याची सर्वागीण स्वच्छता करण्यात आली. ३१ डिसेंबर होणाऱ्या पार्टी,  दारू, मौजमस्ती यावर होणारी उधळपट्टी रोखून मंडळाने केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here