कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण : जिल्हाधिकारी देसाई

0
52

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शनिवारी जिल्ह्यात सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ३७ हजार ५८० व्हॅक्सीन जिल्ह्यात दाखल झाले. याबाबत लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात ६ आणि जिल्ह्यातील ८ केंद्रांवर याचा प्रारंभ होईल,  अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (बुधवार)  दिली. लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

देसाई म्हणाले की, लसीकरण मोहिमेसाठी सामाजिक संस्था,  वैद्यकीय संघटना,  खासगी डॉक्टर्स या सर्वांचा सहभाग घ्यावा. त्यामध्ये धर्मगुरूंनाही निमंत्रित करावे. लसीकरणासाठी सर्व लोकप्रतिनिधींना नजीकच्या केंद्रांवर शुभारंभ प्रसंगी निमंत्रित करावे. महापालिका क्षेत्रात ६ आणि जिल्ह्यातील ८ केंद्रांवर अशा एकूण १४ केंद्रांवर प्रत्येक केंद्रांवर १०० लाभार्थीप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी.

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here