कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात घरफाळा दंड व्याजावरील सवलतीसाठी महापालिकेची नागरी सुविधा केंद्रे ३० आणि ३१ जानेवारी या सुट्टी‍ दिवशीही कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना घरबसल्या आपली थकीत रक्कम भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट रक्कम भरण्याचीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच सुविधा केंद्रामध्ये गर्दी होऊ नये म्हणून पैसे भरण्याचे काऊंटर उपलब्ध केले आहे. तरी नागरिकांनी  घरफाळा सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी केले आहे.

महापालिकेने १ हजार स्केअर फूटाच्या आतील निवासी मिळकतधारकांना दंडच्या व्याजामध्ये २६ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात ७० टक्के, १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात ६० टक्के व १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत  एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात ५० टक्के सवलत दिली आहे.  १ हजार स्केअर फूटाच्या वरील निवासी मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये २६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत  एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात ५० टक्के, १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात ४० टक्के व १ मार्च ते ३१ मार्च २०२१ पर्यंत एकरकमी संपूर्ण कराची रक्कम भरल्यास दंड व्याजात ३० टक्के सवलत दिली आहे.

त्यानुसार नागरिकांना आपली घरफाळा थकबाकी भरता यावी यासाठी  नागरी सुविधा केंद्र क्र.१, गांधी मैदान, नागरी सुविधा केंद्र क्र. २, शिवाजी मार्केट, नागरी सुविधा केंद्र क्र. ३, राजारामपूरी, बागल मार्केट, नागरी सुविधा केंद्र क्र. ४, ताराराणी मार्केट, कावळा नाका, नागरी सुविधा केंद्र, मुख्य इमारत, पाणीबिल वसुली केंद्र, कसबा बावडा व Online Payment करणेसाठी www.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईटवर Online रक्कम भरुन घेण्यात येईल.  तसेच ऑनलाइन प्रणालीद्वारे संकेतस्थळावरून कर भरणा करताना  सवलतीची रक्कम ऑनलाइनद्वारे स्वतः वजा करू नये. सिस्टीमद्वारे सवलतीची रक्कम आपोआप वजा होते, याची नोंद घ्यावी.