इचलकरंजी (प्रतिनिधी) : कुंभार समाजाच्या भावना समजून घेऊन केंद्रातील मोदी सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज (बुधवार) इचलकरंजीत कुंभार समाज बांधवांनी साखर, पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.

१ जानेवारीपासून प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर कुंभार बांधवांनी आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाची दखल घेत अखेर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बंदी निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली. या निर्णयामुळे कुंभार समाजबांधवांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जल्लोष केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर साखर, पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

या वेळी जिल्हा कुंभार समाज कृती समितीचे युवा अध्यक्ष उत्तम कुंभार, पिंटू कुंभार, सुभाष कुंभार, रविकांत कुंभार, गोरख कुंभार, संजय कुंभार, सुनिल कुंभार, संदीप कुंभार, बजरंग कुंभार आदी उपस्थित होते.