सण-उत्सव साजरे करताना आचारसंहितेचे पालन करा : जयश्री देसाई

पन्हाळा (प्रतिनिधी) : सध्याचा काळ हा निवडणूकीचा आहे त्यामुळे पन्हाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच गावात या कालावधीत यात्रा, आंबेडकर जयंती, गुढीपडावा, रमजान ईद यासारखे धार्मिक सण, सामाजिक उत्सव साजरे होणार आहेत. ते साजरे करत असताना आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांनी केले. त्या पन्हाळा येथे निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत… Continue reading सण-उत्सव साजरे करताना आचारसंहितेचे पालन करा : जयश्री देसाई

कळे बाजारपेठेत चैत्र गुढी पाडव्याची जय्यत तयारी सुरु…

कळे (प्रतिनिधी) : मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण असणाऱ्या चैत्र गुढी पाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे (ता.पन्हाळा) येथे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह असून सणानिमित्त बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरु असल्याचे दिसत आहे.  कोल्हापूरच्या पश्र्चिम भागातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे येथील विविध दुकानांमध्ये गुढी पाडव्यानिमित्त खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. विशेषतः कपडे व… Continue reading कळे बाजारपेठेत चैत्र गुढी पाडव्याची जय्यत तयारी सुरु…

सेवा प्रकोष्टने समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. येथील विविध मतदारसंघांना भेटी देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान भाजपा सेवा प्रकोष्टच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच सेवा प्रकोष्टने समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील… Continue reading सेवा प्रकोष्टने समाजाची गरज ओळखून काम केले पाहिजे : मंत्री चंद्रकांत पाटील

अभिमानास्पद : दिंडनेर्लीची मधुरा बोटे ‘STS’ परीक्षेत राज्यात पहिली

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचवडे संचलित. समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील मधुरा दत्तात्रय बोटे या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मधुरा ही विद्या मंदिर दिंडनेर्ली शाळेची विद्यार्थिनी असून तिने 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर श्रेयस रोहित गायकवाड 100 पैकी 98 गुण मिळवून राज्यात द्वितीय… Continue reading अभिमानास्पद : दिंडनेर्लीची मधुरा बोटे ‘STS’ परीक्षेत राज्यात पहिली

पाण्याची बचत करणे ही काळाची गरज : अभिषेक शिंदे

पन्हाळा (प्रतिनिधी) : जागतिक जल दिननिमित्त पन्हाळा आयटीाय येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे तांत्रिक विभागीय अधिकारी अभिषेक शिंदे, एरिया मॅनेजर नितीन चव्हाण उपस्थित होते. यावेळी पाण्याचे महत्व, त्याची उपयुक्तता तसेच पाण्याची जास्तीत जास्त बचत करणे ही काळाची गरज आहे असे मत अभिषेक शिंदे यांनी व्यक्त केले. तर प्रशांत कांबळे यांनी जल… Continue reading पाण्याची बचत करणे ही काळाची गरज : अभिषेक शिंदे

इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. चिदानंद मगदूम यांचे कोरे अभियांत्रिकीत मार्गदर्शन…

वारणा (प्रतिनिधी) : त्रिवेंद्रममधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील शास्त्रज्ञ डॉ. चिदानंद मगदूम यांनी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) वारणानगर कॅम्पसला भेट दिली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,रजिस्ट्रार, संचालक, अधिष्ठाता, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. डॉ. मगदूम यांनी, इस्रोमधील अभियंत्यांच्या शिस्तबद्ध योगदानावर आणि शैक्षणिक कामावरही प्रकाश टाकला. या संवादात प्राध्यापकांनी… Continue reading इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. चिदानंद मगदूम यांचे कोरे अभियांत्रिकीत मार्गदर्शन…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी ऊर्जा साठवण्यासाठी प्रथमच उपयोगात येणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘डिस्प्रोसियम सल्फाईड फिल्म्स’ बनविण्याच्या ‘सीबीडी’ या रासायनिक पद्धतीसाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट मंजूर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ४० वे पेटंट आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे रिसर्च डायरेक्टर… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ऊर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट…

‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅचला ‘ब्रीज कोर्स’ ची धूमधडाक्यात सुरुवात…

कुडाळ (प्रतिनिधी) : अवघ्या सर्व ज्युनिअर कॉलेजना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅच’ला ‘ब्रीज कोर्स’ ने धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. मुख्य हायब्रीड प्रोग्राम सुरू होण्यापूर्वीच इ. 10 वीच्या विद्यार्थी तसेच पालकांमध्ये या बॅचबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ‘लाईव्ह मराठी’ या बॅचचा मीडिया पार्टनर आहे. ‘सुपर 30’ ची ‘CVRaman_बॅच’ 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे.… Continue reading ‘सुपर 30’च्या ‘CVRaman_बॅचला ‘ब्रीज कोर्स’ ची धूमधडाक्यात सुरुवात…

शिरोळ येथे ‘शांताई’चे प्रकाशन…

शिरोळ (प्रतिनिधी) : बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमाच्या पंचविसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा सोहळा शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यात पार पाडला. गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धूमे लिखित शांताई या पुस्तकाचे प्रकाशन आज (सोमवार) साखर कारखान्याच्या प्रांगणात झाले. यावेळी सकाळचे ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब… Continue reading शिरोळ येथे ‘शांताई’चे प्रकाशन…

पहिल्या स्वदेशी निर्मित लढाऊ रणगाड्याच्या इंजिनासाठी कोल्हापुरातील सरोज आयर्नचे योगदान…

टोप (प्रतिनिधी) : सार्वजनिक क्षेत्रातील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने त्यांच्या म्हैसूर प्लांटमध्ये लष्करी रणगाडासाठी स्वदेशी निर्मित १५०० एचपी इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे. नव्या इंजिनासाठी आवश्यक असणारे सिलिंडर हेड हे कोल्हापुरातील शिरोली औद्योगिक वसाहतीतील नामांकित मे. सरोज आयर्न यांनी विकसित केले असून यासाठी या उद्योग संस्थेचे संचालक दीपक जाधव आणि भरत जाधव यांचा… Continue reading पहिल्या स्वदेशी निर्मित लढाऊ रणगाड्याच्या इंजिनासाठी कोल्हापुरातील सरोज आयर्नचे योगदान…

error: Content is protected !!